बाहुबली - देवसेना खऱ्याखुऱ्या आयुष्यात येणार एकत्र?

'बाहुबली २: द कन्क्लुजन' या चित्रपटातून जागतिक पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली बाहुबली आणि देवसेनेची लोकप्रिय जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

Updated: May 24, 2017, 04:05 PM IST
बाहुबली - देवसेना खऱ्याखुऱ्या आयुष्यात येणार एकत्र? title=

मुंबई : 'बाहुबली २: द कन्क्लुजन' या चित्रपटातून जागतिक पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली बाहुबली आणि देवसेनेची लोकप्रिय जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

बाहुबलीच्या भूमिकेत दिसलेला प्रभास आणि देवसेनेच्या भूमिकेत दिसलेली अनुष्का शेट्टी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्यांना ऊत आलाय. खुद्द अनुष्कानं या बातम्यांचं खंडन केलं असलं तरी दोघांमधली केमिस्ट्री पाहिल्यानंतर तिचा हा नकार अनेकांच्या पचनी पडत नाहीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का 'बाहुबली' सिनेमाचं शुटींग सुरू होण्यापूर्वीच प्रभाससोबत विवाह करण्यास उत्सुक होती... परंतु, सिनेमावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रभासनं लग्नाची गोष्ट पुढे ढकलली. 

बुजऱ्या स्वभावाचा प्रभास आणि अनुष्का यांची जोडी तेलगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय आहे. बाहुबलीपूर्वी 'बिल्ला' आणि 'मिर्ची' या सिनेमांतही ते एकत्र दिसले होते.