...म्हणून बाहुबली भाग १ पुन्हा होणार प्रदर्शित

भारतीय सिनेसृष्टीत गाजलेला सिनेमा बाहुबलीता पहिला भाग पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली'च्या दुसऱ्या भागाची सर्व जण वाट बघत आहेत. दुसऱ्या भागाचा ट्रेलर काल लॉन्च झाला आणि बघता बघता तो हिट झाला. पण पहिल्या भागामध्ये गाजलेला एक प्रश्न की कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात याचं उत्तर मिळेल असं प्रेक्षकांना वाटतंय.

Updated: Mar 17, 2017, 09:46 AM IST
...म्हणून बाहुबली भाग १ पुन्हा होणार प्रदर्शित title=

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीत गाजलेला सिनेमा बाहुबलीता पहिला भाग पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली'च्या दुसऱ्या भागाची सर्व जण वाट बघत आहेत. दुसऱ्या भागाचा ट्रेलर काल लॉन्च झाला आणि बघता बघता तो हिट झाला. पण पहिल्या भागामध्ये गाजलेला एक प्रश्न की कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात याचं उत्तर मिळेल असं प्रेक्षकांना वाटतंय.

'बाहुबली'च्या निर्मात्यांचं असं मत आहे की, काही प्रेक्षकांनी अजूनही बाहुबली पहिला भाग पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी हा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे कारण तो इतरांना बघता यावा. 'बाहुबली: द बिगिनिंग' आता पुन्हा रिलीज केला जाणार आहे.

दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणतात की, आम्ही 'बाहुबली २' रिलीज होण्याआधी "बाहुबली: द बिगिनिंग' हा पहिला भाग रिलीज करणार आहोत कारण ज्यांना पहिला भाग बघता नाही आला त्यांना तो बघता येईल. कारण तो त्यांना समजून घेता येईल आणि मग भाग २ सिनेमाचाही आनंद घेता येईल.

'बाहुबलीचे अजून पुढचे भाग ही येतील का या प्रश्नावर बोलतांना राजामौलींनी म्हटलं की, सिक्वेल करण्यासाठी सिनेमाची कथा ही मजबूत असली पाहिजे. लोकांची मागणी आहे म्हणून आम्ही सिनेमा नाही बनवू इच्छित. सिनेमाची कथा त्याच्या आत्म्या प्रमाणे असते. 

'बाहुबली २: द कन्क्लूजन' २८ एप्रिलला रिलीज होणार आहे. 'बाहुबली: द बिगिनिंग'चा सिक्वेल आहे. प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन आणि सत्यराज यासारखे कलाकार या सिनेमात आहे.