शाहिदच्या 'हैदर'वर हृतिकचा 'बँग बँग' पडला भारी!

बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा कमाईच्या हिशोबानं यशस्वी ठरलाय.

Updated: Oct 4, 2014, 02:52 PM IST
शाहिदच्या 'हैदर'वर हृतिकचा 'बँग बँग' पडला भारी! title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा कमाईच्या हिशोबानं यशस्वी ठरलाय.

शाहिद कपूर-श्रद्धा कपूर यांचा ‘हैदर’ आणि हृतिक रोशन-कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हे दोन सिनेमे एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर झळकले... साहजिकच या दोन्ही सिनेमांमध्ये चांगलीच स्पर्धा होती. 

हृतिकच्या ‘बँग बँग’नं पहिल्याच दिवशी जोरदार प्रदर्शन करत २७.५४ करोड रुपयांच कमाई केलीय. तर शाहिदच्या ‘हैदर’नं पहिल्या दिवशी ६.१४ करोड रुपयांची कमाई केली. 

गल्ल्याचा हिशोब वेगळा असला तरी ‘बँग बँग’पेक्षा ‘हैदर’ला सिनेपरिक्षकांनी उचलून धरल्याचं दिसतं. हैदरच्या निमित्तानं शाहिदचंही सिनेपरिक्षकांकडून कौतुक होताना दिसतंय.

आपल्या पहिल्या दिवशीच्या कमाईसहित बँग बँग बॉलिवूडच्या पहिल्याच दिवशी जास्त कमाई करणाऱ्या पहिल्या पाच सिनेमांमध्ये सहभागी झालीय. या लिस्टमध्ये धूम-३ (३६ करोड), चेन्नई एक्सप्रेस (३३.१० करोड), एक था टायगर (३२.९२ करोड) आणि सिंघम रिटर्न्स (३२ करोड) या सिनेमांचा समावेश आहे. 

सिंघम रिटर्न्स (३२ करोडची कमाई) नंतर ‘बँग बँग’ २०१४ सालातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी ‘ओपनर फिल्म’ बनलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.