लवकरच बिग बी आणि फरहान दिसणार एकत्र

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी काम करण्याची संधी मिळणे खूप भाग्याची गोष्ट असते, अशी बॉलिवूडमधील अनेकांची इच्छा असते.  तरी, प्रत्यक्षात जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते, तेव्हा या कलाकारांना कमालीचे दडपण येते. परंतु, सेटवरील अमिताभ बच्चन यांच्या सहज वागण्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. कालांतराने या महानायकाबरोबर काम करणे त्यांना सोपे वाटू लागते. 

Updated: Dec 1, 2014, 06:09 PM IST
लवकरच बिग बी आणि फरहान दिसणार एकत्र title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी काम करण्याची संधी मिळणे खूप भाग्याची गोष्ट असते, अशी बॉलिवूडमधील अनेकांची इच्छा असते.  तरी, प्रत्यक्षात जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते, तेव्हा या कलाकारांना कमालीचे दडपण येते. परंतु, सेटवरील अमिताभ बच्चन यांच्या सहज वागण्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. कालांतराने या महानायकाबरोबर काम करणे त्यांना सोपे वाटू लागते. 
'वझिर' या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करीत असलेल्या फरहान अख्तरलासुद्धा हाच अनुभव आला. याविषयी तो म्हणतो, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणे खूपच सोपे होते. त्यांचे व्यक्तिमत्व  खूप सकारात्मक आहे, सेटवरील सह-कलाकाराबरोबरच्या त्यांच्या सहससुलभ वागण्याने तणाव नाहिसा होतो. त्यांच्याबरोबरचा सेटवरील माझा पहिला दिवस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु, त्यांच्याबरोबर काम करणे अतिशय सोपे आहे. 
सेटवर पोहोचल्यावर ज्या क्षणी गप्पा मारायला सुरुवात केली, त्याचवेऴेस मनावरील दडपण नाहीसे होते. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आश्चर्यकारक असल्याची भावना फरहानने  व्यक्त केली.
विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेला आणि बिजॉय नंबियार यांचे दिग्दर्शिन असलेल्या 'वझिर' चित्रपटात अमिताभ बच्चन पक्षाघात झालेल्या ज्येष्ठ बुध्दिबळपटूची भूमिका साकारत असून, फरहान 'एटीएस' अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.