'बिग बॉस'च्या ओम स्वामींनी धारण केला नवा अवतार

भगवे कपडे धारण केलेले, मोठे केस वाढवलेले 'बिग बॉस'मध्ये दिसलेले ओम स्वामी आठवतायत का? तेच ओम स्वामी आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत... पण, वेगळ्या रुपात... 

Updated: Apr 7, 2017, 08:43 AM IST
'बिग बॉस'च्या ओम स्वामींनी धारण केला नवा अवतार title=

मुंबई : भगवे कपडे धारण केलेले, मोठे केस वाढवलेले 'बिग बॉस'मध्ये दिसलेले ओम स्वामी आठवतायत का? तेच ओम स्वामी आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत... पण, वेगळ्या रुपात... 

बिग बॉसच्या सीझन १० मध्ये सर्वात वादग्रस्त ठरलेले स्वयंभू देवात्मा ओम स्वामी पुन्हा एकदा मीडियासमोर आलेत... पण, आता मात्र त्यांचा अवतार डोक्यापासून पायापर्यंत बदलून गेलाय. आपला लूक त्यांनी असा काही बदलून टाकलाय की समोरच्याला त्यांची लवकर ओळखही पटणार नाही. 

दाढी-मिशा काढून, भगवे वस्र फेकून देऊन स्वामींनी आता आधुनिक कपडे परिधान करायला सुरुवात केलीय. 

बिग बॉसच्या घरात अनेकदा स्वत:हून वाद ओढावून घेणाऱ्या ओम स्वामींनी व्हीजे वाणी आणि रोहन मेहरा यांना शिवीगाळ केली होती. यावरून त्यांच्यावर कारवाईही झाली. घरातून बाहेर काढल्यानंतरही त्यांचं वागणं तसंच राहीलं... आणि ते कायद्याच्या कचाट्यात अडकले. 

नुकतेच ओम स्वामी छेडछाड केल्यावरूनही चर्चेत राहिले. इतकंच नाही तर त्यांनी रेल्वे स्टेशनवरच कपडे बदलल्यानं ते पुन्हा चर्चेत आले. आता ते नव्या रुपात पुन्हा एकदा काही वाद ओढावून घेतील का?