'बिग बॉस ९' रोशेल आणि मंदनाचा झालं भांडण, मग रडारडी...

 बिग बॉस ९ च्या डबल ट्रबलमध्ये आता प्रेक्षकांनी पाहावं असं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या टास्कमध्ये वाद पाहायला मिळले होते. त्यानंतर आता दुसऱ्या प्रकार समोर आला आहे, त्यात रोशेल आणि मंदना यांच्यात भांडण दिसत आहे. 

Updated: Oct 15, 2015, 02:16 PM IST
'बिग बॉस ९' रोशेल आणि मंदनाचा झालं भांडण, मग रडारडी...  title=

मुंबई :  बिग बॉस ९ च्या डबल ट्रबलमध्ये आता प्रेक्षकांनी पाहावं असं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या टास्कमध्ये वाद पाहायला मिळले होते. त्यानंतर आता दुसऱ्या प्रकार समोर आला आहे, त्यात रोशेल आणि मंदना यांच्यात भांडण दिसत आहे. 

शोच्या तिसऱ्या दिवशीच जोरजोरात भांडण झाल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रकार एकाच व्यक्तीमध्ये दोन मुलींनी इंटरेस्ट दाखविल्याने सुरू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून बिग बॉसचे सदस्य कॅथ आणि रोशेल रिअल लाइफमध्ये एकमेकांना डेट करीत आहेत. 

या शोच्या फॉरमॅटनुसार कॅथची पार्टनर मंदना बनली आहे. तर रोशेलचा पार्टन प्रिन्स नरूला आहे. 

शो जसा पुढे जात आहे, तशी कॅथ आणि मंदना यांच्यातील जवळीक वाढते आहे. त्यामुळे काल रात्री रोशेल आणि मंदना यांच्यात जोराचं भांडण झालं. 

मंदनाने आपल्या पार्टनर कॅथला सांगितले की, विकास भल्ला आणि अरविंद वेगडा यांच्या घोरण्याचा त्रास होत असल्याने आपली जागा बदलण्यास सांगितले होते. ही गोष्ट रोशेलला आवडली नाही. 

तसे झाले असते तर रोशेल आणि कॅथला वेगळे व्हावे लागले असते. रोशेलने या बाबत मंदनाशी चर्चा केली की त्यावर मंदना म्हटली की मी यावर कॅथशी चर्चा केलीच होती. याबाबत कॅथला कोणतीच अडचण नव्हती. त्यानंतर वाद सुरू झाला. 

रोशेलने रडत रडत म्हटले कॅथ माझा बॉयफ्रेंड आहे. मंदनाला काही अधिकार नाही की ती त्याला आपला पार्टनर म्हणेल. मंदनाने याकडे लक्ष न देता झोपणेच पसंत केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.