मुंबई : टीव्हीवरील सर्वात चर्चिला जाणारा शो बिग बॉसमध्ये टर्निंग पाईंट आला आहे. या नव्या ट्विटस्टमुळे आता किथ सिक्वेराच्या पत्नी समयुक्ता सिंग हिची वाईल्ड कार्डने एंट्री होण्याची शक्यता आहे. किथची एक्स-वाईफ समयुक्ताची पहिली वाईल्ड कार्डने कंटेस्टेंड होऊ शकते.
किथ मॉडेल आणि एंकर रोशेल मारिया राव यांच्यात डेट सुरु आहे. बिग बॉसच्या घरात किथ आणि रोशलची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांना सपोर्ट करत आहेत. या शोमध्ये अधिक रंजकता वाढलेय. कारण या शोमध्ये समयुक्ताला अप्रोच करण्यात आलेय. त्यामुळे समयुक्ताची एंट्री झाली तर किथ आणि रोशल यांच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे.
बॉलिवूड अॅक्ट्रेस समयुक्ता १९९४ मध्ये 'सलामी' या सिनेमात काम केले आहे. ती म्युझिक डायरेक्टर अजित सिंगची मुलगी आहे. तर टीव्ही अभिनेत्री नताशा सिंगची बहिण आहे. यशस्वी व्हिजे झाल्यानंतर किथने समयुक्ताबरोबर डेट करण्यास सुरुवात केली. डेटींगनंतर दोघांनी लग्न केले. साधारण ७ वर्षे एकत्र राहिल्यानंतर किथ आणि समयुक्ता वेगळे झालीत.
दरम्यान, बिग बॉस -९ मध्ये समयुक्ता येणार आहे की नाही, याबाबत पुष्टी मिळालेली नाही. मात्र, तिची एंट्री झाली तर शोमध्ये नविन टर्निग पॉईंट असेल. त्यामुळे किथ हा दुहेरी कात्रीत सापडेल. तो एकाच घरात आपली गर्लफ्रेंड आणि एक्स वाईफ समयुक्ता यांना कसे मॅनेज करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.