पाकिस्तानमध्ये 'दिलवाले'ने टाकले 'बाजीराव'ला मागे

भारतासह जगभरात १८ डिसेंबर रोजी रिलीज झालेले दोन चित्रपट 'दिलवाले' आणि 'बाजीराव-मस्तानी' यांच्या जबदस्त टक्कर सुरू आहे. ही टक्कर आता बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये जोरदार कमाई करत आहे, पण 'बाजीराव-मस्तानी' पेक्षा काजोल-शाहरूखची 'दिलवाले' धूम करत आहे. 

Updated: Dec 23, 2015, 02:25 PM IST
पाकिस्तानमध्ये 'दिलवाले'ने टाकले 'बाजीराव'ला मागे  title=

 कराची : भारतासह जगभरात १८ डिसेंबर रोजी रिलीज झालेले दोन चित्रपट 'दिलवाले' आणि 'बाजीराव-मस्तानी' यांच्या जबदस्त टक्कर सुरू आहे. ही टक्कर आता बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये जोरदार कमाई करत आहे, पण 'बाजीराव-मस्तानी' पेक्षा काजोल-शाहरूखची 'दिलवाले' धूम करत आहे. 
 
 कमाईच्या बाबतीत रोहित शेट्टीच्या दिलवाले'ने संजय लीला भंसालीच्या 'बाजीराव मस्तानी'ला मागे टाकले आहे. 'दिलवाले'ने रिलीज झाल्यावर पहिल्या आठवड्यात ६.५ कोटींची कमाई केली तर बाजीराव मस्तानी केवळ २.१ कोटी कमाई करू शकला. 
 
 वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रेक्षक बाजीराव मस्तानीला अधिक पसंती देत आहेत.