कणकवलीत सागर कारंडे झाला 'सौभाग्यवती'तील वैभव मांगले

सागर कारंडे 'माझे पती सौभाग्यवती' तील (वैभव मांगले ) लक्ष्मीची भूमिका केली होती. 

Updated: Jan 8, 2016, 07:31 PM IST

कणकवली : 'चला हवा येऊ द्या' हा हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम या आठवड्यात आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात कोकणनगरी कणकवलीत झाला. या कार्यक्रमात सागर कारंडे 'माझे पती सौभाग्यवती' तील लक्ष्मीची (वैभव मांगले ) भूमिका केली होती. 

 
भाऊ कदम याने हेअर ड्रेसरची भूमिका केली तर कुशल बद्रिके याने रमेश भाटकरच्या भंडारीची भूमिका केली. या आपल्या शानदार स्किटमध्ये सर्वांनी जबरदस्त धमाल केली. 

काही बॉलिवूडच्या गाण्यांवरही सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांनी परफॉरमन्स केला. हा कार्यक्रम तुम्ही सोमवारी पाहणार आहात पण पाहा या कार्यक्रमाची एक झलक...