मराठी सिनेमा दगडी चाळ : चुकीला माफी नाही

अंडरवर्ल्ड डॉन आणि सध्या टाडाखाली शिक्षा भोगत असलेला डॅडी अर्थात अरुण गवळी याच्या प्रसिध्द दगडी चाळीवर आधारित ‘दगडी चाळ’ हा मराठी सिनेमा काढण्यात आलाय. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय. शिक्षेला माफी नाही...असं वाक्य बरच काही सांगून जाते.

Updated: Sep 26, 2015, 11:01 AM IST
मराठी सिनेमा दगडी चाळ : चुकीला माफी नाही title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि सध्या टाडाखाली शिक्षा भोगत असलेला डॅडी अर्थात अरुण गवळी याच्या प्रसिध्द दगडी चाळीवर आधारित ‘दगडी चाळ’ हा मराठी सिनेमा काढण्यात आलाय. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय. शिक्षेला माफी नाही...असं वाक्य बरच काही सांगून जाते.

‘दगडी चाळ’ या सिनेमाचे पोस्टर आधीच रिलीज झाले आहे. हा सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा चंद्रकांत कणसे यांनी दिग्दर्शित केलाय. या सिनेमाचा निर्माता अमोल काळे आणि सुरेश सावंत हे आहेत.
 
बॉलिवूडमध्ये अनेक डॉनच्या जीवनावर फिल्म काढण्यात आल्यात. आता मराठीत डॉन अरुण गवळी याच्यावर हा सिनेमा काढण्यात आलाय. त्यामुळे या सिनेमाविषयी उत्सुकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.