'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनंतर भुतांच्या गंमती..! व्हायरल

झी मराठी वाहिणीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काहींनी विरोध केला. मात्र, मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही. तरीही सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 5, 2016, 04:00 PM IST
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनंतर भुतांच्या गंमती..! व्हायरल title=

मुंबई : झी मराठी वाहिणीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काहींनी विरोध केला. मात्र, मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही. तरीही सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल होत आहेत.

कोकणात १४ प्रकाराची भूते पाहावयास मिळतात.

१) वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात.
कोकणातील पिशाच्चे ही वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो.    

२) ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणांचे मानले जाते.जो वेदात निपूण आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.त्याचे हे भूत.

३) समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा तीठा अशा ठिकाणी पकडते. हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवस्थानाच्या आड मार्गे केला तर देवस्थान देखील पुढे येत नाही.

४) देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
याची सहानभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, कोंबडा द्यावा लागतो.

५) मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.

६) खविस: ज्याला क्रुरपने मारतात त्याचे हे भुत.हे फार ञासदायक भूत असते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.

७) गिर्या / गिऱ्हा - जो माणूस बुडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे. हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फारत्रासदायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.

कोकणात असे सांगितले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनते.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्हेची संकटे आणून सोडतो.

८) चेटकीण : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ ) झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.

१०) विर - हे भूत क्षत्रीय समाजाच्या व्यक्तीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.

११) लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .

१२) खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते

१३) बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किंवा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते.

वरील सर्व भुते गावांच्या आसपास असतात त्यामुळे जंगलातून ट्रेकीग करणा-याना या भुतांचा अजिबात त्रास होत नाही फक्त गावाच्या आसपास जाऊ नये. ट्रेकीॆग  करणा-याना बाधणारे एकच भूत 'चकवा'

१४) चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....

(वरील माहितीची सत्यता............ कोकणातील भूतांनाच माहित)

"हयसर रात्रीचा फिरना बरा नाय हा ...कोकणाकडची
भुता लयss वाईट .... एकदा धरल्यानी कि सोडनत नाय "
व्हॉट्सअॅप वर हा मेसेज फिरतो अशी बातमी कर...
कोकणातील १४ भूते व्हॉट्सअपवर व्हायरल

(वरील माहितीशी झी २४ तास सहमत नाही... हे मसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.)

दरम्यान, झी मराठीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले.