'सैराट'च्या हिरोबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

सैराट चित्रपटात परश्या ही व्यक्तिरेखा करणाऱ्या आकाश ठोसरच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जातेय. पदार्पणाच्या सिनेमात त्याने दमदार भूमिका केल्याने मराठी इंडस्ट्रीला एक हँडसम हिरो भेटल्याचे म्हटले जातेय.

Updated: May 6, 2016, 02:49 PM IST
'सैराट'च्या हिरोबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : सैराट चित्रपटात परश्या ही व्यक्तिरेखा करणाऱ्या आकाश ठोसरच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जातेय. पदार्पणाच्या सिनेमात त्याने दमदार भूमिका केल्याने मराठी इंडस्ट्रीला एक हँडसम हिरो भेटल्याचे म्हटले जातेय.

कोण आहे हा आकाश ठोसर

आकाश ठोसर अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी मल्ल होता. त्याला कुस्तीची खूप आवड आहे.

शिक्षण 

पुण्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज, औंध येथून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे युनिर्व्हसिटीतून शिक्षण घेतले. त्याने कॉलेजमध्ये असताना काही नाटकांत भाग घेतला होता. तो बाहेरुन एम.एचे शिक्षण घेतोय. 

अभिनयाचा प्रवास

नागराज मंजुळे यांच्या भावाने प्रथम आकाशला रेल्वे स्टेशनवर पाहिले. त्यानंतर ऑडिशन दिल्यानंतर त्याची चित्रपटासाठी निवड करण्यात आली. चित्रपटासाठी त्याने तब्बल १३ किलो वजन कमी केलं.