इमरान हाश्मीच्या हिरोईनवर रस्त्यावर राहण्याची वेळ

ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल... पण हे खरं आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची हिरोईन म्हणून एका सिनेमात दिसलेली अलिसा खान हिच्यावर सध्या रस्त्यावर राहण्याची वेळ आलीय. 

Updated: Jun 10, 2016, 10:30 AM IST
इमरान हाश्मीच्या हिरोईनवर रस्त्यावर राहण्याची वेळ title=

नवी दिल्ली : ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल... पण हे खरं आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची हिरोईन म्हणून एका सिनेमात दिसलेली अलिसा खान हिच्यावर सध्या रस्त्यावर राहण्याची वेळ आलीय. 

दिल्लीच्या ग्रेटर कैलाशच्या रस्त्यांवर अलिसा राहत असल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलंय. 
 
एक्स बॉयफ्रेंडसोबतचा एक अश्लील व्हिडिओ ऑनलाईन लिक झाल्यानंतर अलिसा हिला तिच्या आप्तेष्टांनी घराबाहेर काढल्याचं सांगण्यात येतंय. 

आपल्या खाजगी व्हिडिओंना ऑनलाईन प्रदर्शित करणाऱ्या आपल्या एक्स बॉयफ्रेंडविरुद्ध  अलिसानं पोलिसांत तक्रारदेखील दाखल केलीय.