ओपनिंगच्या दिवशी फॅनची २० कोटींची कमाई

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित फॅन हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी शाहरुखच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. 

Updated: Apr 16, 2016, 01:45 PM IST
ओपनिंगच्या दिवशी फॅनची २० कोटींची कमाई title=

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित फॅन हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी शाहरुखच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. 

ओपनिंगच्या दिवशी या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली. मात्र या चित्रपटाने शाहरुखच्याच दिलवाले या सिनेमाचा पहिल्या दिवशीचा रेकॉर्ड मोडला नाही. दिलवाले चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटींची कमाई केली होती. 

दुसरीकडे गेल्या आठवड्यात जंगल बुक हा चित्रपटही सलग दुसऱ्या आठवड्यात बक्कळ कमाई करतोय. त्यामुळे शाहरुखच्या फॅनला जंगल बुक जोरदार टक्कर देत असल्याचे दिसतेय.