भाजपमध्ये रिमी सेनचा प्रवेश, सनी देओलच्या सहभागाची शक्यता

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 24, 2017, 05:33 PM IST
भाजपमध्ये रिमी सेनचा प्रवेश, सनी देओलच्या सहभागाची शक्यता title=

नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धेक रिमी सेन भारतीय  जनता पक्षात सामील झाली. तसेच तिच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री-मॉडेल कशिश खाननेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बॉलिवुड अभिनेता सनी देओलही पक्षात सामील होऊ शकतात. 

काही दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ भारतीय जनता पक्षात सामील होऊ शकतात, अशी बातमी आली होती. यावेळी अर्जुन रामपाल याने मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रशंसा केली होती. तसेच जॅकी दादाही भाजपमध्ये सामील होऊ शकतो अशी  बातमी होती.