इम्रान-विद्याच्या 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक

सिनेनिर्माता महेश भट्टनं इम्रान हाश्मी आणि विद्या बालन यांच्या अभिनयात नटलेल्या एका प्रेमकहाणीचा 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक जाहीर केलाय. 

Updated: Feb 13, 2015, 08:20 AM IST
इम्रान-विद्याच्या 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक title=

मुंबई : सिनेनिर्माता महेश भट्टनं इम्रान हाश्मी आणि विद्या बालन यांच्या अभिनयात नटलेल्या एका प्रेमकहाणीचा 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक जाहीर केलाय. 

या सिनेमाची निर्मिती भट्ट कॅम्पच्या विशेष फिल्मनं केलंय. या सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सुरीनं केलंय. 

या फोटोमध्ये इम्रान आणि विद्या एकमेकांकडे भरलेल्या नजरेनं पाहत आहेत. महेश भट्ट यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करून लिहिलंय... 'हमारी अधुरी कहानीचा फर्स्ट लूक, अनैतिक प्रेम जे इतकं खरं आहे की दिव्यतेला स्पर्शून जातं...'

हा सिनेमा १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेदिग्दर्शक सूरीनंही हा फोटो शेअर केलाय. 

या सिनेमामधून तब्बल तीन वर्षानंतर इम्रान हाश्मी भट्ट कॅम्पमध्ये परततोय. भट्ट कॅम्पसोबत त्याचा शेवटचा सिनेमा 'राज थ्रीडी' २०१२ मध्ये आला होता. 

इम्रान - विद्या ही ऑनस्क्रीन जोडी या सिनेमाच्या निमित्तानं तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. यापूर्वी ते 'डर्टी पिक्चर' आणि 'घनचक्कर'मध्येही एकत्र काम केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.