गजेंद्र चौहान यांनी FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा - सलमान

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTIIच्या अध्यक्षपदाचा वाद थांबता थांबत नाहीय. टीव्ही अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा, असं आता दबंग खान सलमाननंही म्हटलंय. यापूर्वी अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी गजेंद्र चौहान यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय.

Updated: Jul 16, 2015, 07:27 PM IST
गजेंद्र चौहान यांनी FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा - सलमान  title=

मुंबई: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTIIच्या अध्यक्षपदाचा वाद थांबता थांबत नाहीय. टीव्ही अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा, असं आता दबंग खान सलमाननंही म्हटलंय. यापूर्वी अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी गजेंद्र चौहान यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय.

यासंदर्भात आज सलमान खान म्हणाला, गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांचं ऐकायला हवं. जर विद्यार्थी त्यांना एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर नाही पाहू इच्छित, तर त्यांनी ते पद सोडून द्यावं. सलमान खान ईदनिमित्त शुक्रवारी रिलीज होणारा आपला चित्रपट 'बजरंगी भाईजान'संदर्भात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

गेल्या महिन्यात 'महाभारत' मालिकेत युधिष्ठिरची भूमिका साकारणाऱ्या गजेंद्र चौहान यांना FTIIचं अध्यक्ष बनवलंय. तेव्हापासून पुण्यातील कॉलेजचे विद्यार्थी त्यांचा विरोध करत आंदोलन करत आहेत. आतापर्यंत विद्यार्थ्यांना अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, किरण राव, रेसुल पूकुट्टी आणि राजकुमार राव सारख्या बॉलिवूड दिग्गजांचं समर्थन मिळालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.