व्हिडिओ: विद्या-इमरानच्या 'हमारी अधुरी कहानी'चा ट्रेलर रिलीज

मोहित सूरी बॉलिवूडमध्ये मनाला भावणाऱ्या रोमँटिक फिल्म्स साठी ओळखले जातात. आशिकी 2, एक विलेन सारख्या सुपर हिट रोमँटिक चित्रपटांनंतर आता मोहित सूरी इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांची मच अवेटेड फिल्म 'हमारी अधुरी कहानी' घेऊन आले आहेत. याचं ट्रेलर नुकतंच लॉन्च झालंय. 

Updated: May 5, 2015, 12:49 PM IST
व्हिडिओ: विद्या-इमरानच्या 'हमारी अधुरी कहानी'चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई: मोहित सूरी बॉलिवूडमध्ये मनाला भावणाऱ्या रोमँटिक फिल्म्स साठी ओळखले जातात. आशिकी 2, एक विलेन सारख्या सुपर हिट रोमँटिक चित्रपटांनंतर आता मोहित सूरी इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांची मच अवेटेड फिल्म 'हमारी अधुरी कहानी' घेऊन आले आहेत. याचं ट्रेलर नुकतंच लॉन्च झालंय. 

फिल्मचं ट्रेलर खूपच इमोशनल आहे. विद्या आणि इमरानची जोडी घनचक्करमध्ये यापूर्वी एकत्र दिसली होती. घनचक्करला खूप यश मिळालं नाही पण त्यांची केमेस्ट्री द डर्टी पिक्चरमध्ये प्रेक्षकांना खूप आवडली.

या दोघांशिवाय चित्रपटात राय कुमार राव पण आहे. ज्यानं विद्याच्या नवऱ्याची दमदार भूमिका साकारलीय. चित्रपटाचा ट्रेलर खूपच एक्सप्रेसिव्ह आणि नवा आहे. 

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.