‘हॅपी न्यू इअर’ या वर्षीचा सर्वात मूर्खपणाचा चित्रपट – जया बच्चन

चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’नं जरी आतापर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी अभिनेत्री जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. अभिषेक बच्चनची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणतात काही वर्षातील अतिशय मूर्खपणाचा हा चित्रपट आहे. 

Updated: Nov 5, 2014, 12:00 PM IST
‘हॅपी न्यू इअर’ या वर्षीचा सर्वात मूर्खपणाचा चित्रपट – जया बच्चन  title=

मुंबई: चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’नं जरी आतापर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी अभिनेत्री जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. अभिषेक बच्चनची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणतात काही वर्षातील अतिशय मूर्खपणाचा हा चित्रपट आहे. 

एका वृत्तपत्रानं छापलेल्या रिपोर्टनुसार एका साहित्यिक कार्यक्रमादरम्यान बोलतांना जया बच्चन यांनी हे वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, ‘हॅपी न्यू इअर’ अतिशय बकवास फिल्म आहे. हे मी चित्रपटातील कलाकारांनाही सांगितलं. मी फक्त अभिषेक त्या सिनेमात आहे म्हणूनच हा चित्रपट पाहिला. जया बच्चन सांगतात, “मी अभिषेकला सांगितलं, जर तू कॅमेऱ्यासमोर अशी मूर्ख भूमिका साकारू शकतो, म्हणजे तू खरोखरच महान अभिनेता आहेस.” सध्या येत असलेल्या चित्रपटांचा भाग मी बनू इच्छित नाही, कदाचित म्हणूनच मी चित्रपटात काम करत नाही, असंही त्या म्हणाल्या. 

शाहरूख खान आणि मल्टिस्टारर फिल्म हॅपी न्यू इअरनं बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार केलाय. शाहरूखच्या रेड चिलीज एटंरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेल कंपनीच्या एका सूत्रांनी सांगितल्यानुसार जगभरात चित्रपटानं ३१० कोटींहून अधिकची कमाई केलीय. चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खाननं केलंय. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.