मुंबई : भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची इच्छा २० वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आहे. हेमा मालिनी यांना डांस स्कूल सुरू करण्याची इच्छा होती. त्यासाठी सरकारने त्यांना मुंबईत जागा मंजूक केली आहे.
१९९६ साली भाजप-शिवसेना सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना जागा देण्यासाठी सांगितलं होतं पण जमीन ही सीआरझेडच्या अंतर्गत येत असल्याने ते प्रलंबितच राहिलं.
नाट्यविहार कला केंद्र असं या डांस स्कूलचं नाव असणार आहे. शाळेच्या एका भागात बगीचा उभारण्यासही सरकारने सांगितले आहे ज्याचा फायदा सामान्य लोकांना होईल. ही शाळा कोणतेही आर्थिक कमाई न करणाऱ्या संस्थेला चालवण्यास देण्यात येणार आहे.