'मला जाग आली तेव्हा त्याचा हात माझ्या अंतर्वस्त्रात होता'

'लव्ह, लॉस अॅन्ड व्हॉट वी एट' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लेखक सलमान रश्दी यांची माजी पत्नी आणि अभिनेत्री पद्म लक्ष्मी चांगलीच चर्चेत आलीय. आपल्या पुस्तकात केलेल्या दाव्यांमुळे लक्ष्मी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलीय. 

Updated: Mar 11, 2016, 01:13 PM IST
'मला जाग आली तेव्हा त्याचा हात माझ्या अंतर्वस्त्रात होता'  title=

नवी दिल्ली : 'लव्ह, लॉस अॅन्ड व्हॉट वी एट' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लेखक सलमान रश्दी यांची माजी पत्नी आणि अभिनेत्री पद्म लक्ष्मी चांगलीच चर्चेत आलीय. आपल्या पुस्तकात केलेल्या दाव्यांमुळे लक्ष्मी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलीय. 

आपल्या आणि सलमान रश्दी यांच्या नातेसंबंधांबाबत धक्कादायक वक्तव्य लक्ष्मीनं आपल्या पुस्तकात केलंय. तसंच सावत्र वडिलांच्या एका नातेवाईकाकडून आपली लैंगिक छळवणूक झाल्याचंही लक्ष्मीनं आपल्या पुस्तकात म्हटलंय. 

काय म्हटलंय पुस्तकात... 

न्यूयॉर्कमधल्या अपार्टमेन्टमध्ये लक्ष्मी आपल्या आईसोबत राहत होती. या घरात आपल्या सावत्र वडिलांच्या एका नातेवाईकासोबत लक्ष्मीला आपला रुम शेअर करावा लागला होता. 'एके रात्री मला जाग आली तेव्हा त्याचा हात माझ्या अंतर्वस्त्रात होता... त्यानंतर त्यानं माझा हातही त्याच्या अंडरपॅन्टमध्ये टाकला... मला माहित नाही, त्याअगोदर हे किती वेळा घडलं असेल... मला काही विशिष्ट कारणामुळे झोप यायची याचा मला संशय आला होता... एकदा एका मुलीकडून तिचा निष्पापपणा तुम्ही हिरावून घेतला तर तुम्हाला तो परत कधीही मिळत नाही' असं लक्ष्मीनं आपल्या पुस्तकात म्हटलंय.   

मी या घटनेची वाच्यता माझ्या आईकडे केली... त्यानंतर मला भारतात पाठवण्यात आलं. खरं तर त्याला घरातून बाहेर काढलं जायला हवं होतं... काही वर्षानंतर माझ्या आईनं रडत माझ्याकडे आपल्या चुकीबद्दल आपलं मन मोकळं केलं, असंही पद्मानं आपल्या पुस्तकात म्हटलंय.