इंग्लिशमध्ये सांगू का म्हणणाऱ्या आर्चीला इंग्लिशमध्ये किती मार्क ?

नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे.

Updated: May 11, 2016, 05:21 PM IST
इंग्लिशमध्ये सांगू का म्हणणाऱ्या आर्चीला इंग्लिशमध्ये किती मार्क ? title=

मुंबई: नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. अर्चीने सिनेमात केलेल्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.

रिंकू राजगुरुने वैयक्तिक जीवनातही कौतूकास्पद कामगिरी केली आहे. तिने नववीत ८१.०६ टक्के मिळवले आहेत. मराठीत सांगतिलेलं कळत नाही का, इंग्लिशमध्ये सांगू का ? हा आर्चीचा सैराटमधला डायलॉग चांगलाच फेमस झाला आहे. याच इंग्लिश विषयामध्ये आर्चीला 73 मार्क मिळाले आहेत. 

पाहा आर्चीची मार्कशीट