हृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज

 गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या हनी सिंगचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हनी सिंग नेहमी नव्या अंदाजात आपले गाणे घेऊन येतो. या वेळी बऱ्याच प्रतिक्षेनंतर हनी सिंग पुन्हा आपल्या हिपहॉप स्टाइलमध्ये गाणं घेऊन आला आहे. 

Updated: Sep 1, 2015, 07:21 PM IST
हृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज  title=

मुंबई :  गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या हनी सिंगचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हनी सिंग नेहमी नव्या अंदाजात आपले गाणे घेऊन येतो. या वेळी बऱ्याच प्रतिक्षेनंतर हनी सिंग पुन्हा आपल्या हिपहॉप स्टाइलमध्ये गाणं घेऊन आला आहे. 

१९९० ची सुपर हीट फिल्म आशिकीतील सुप्रसिद्ध गाणे 'धीरे धीरेसे मेरी जिंदगी में' हे गाणे हनी सिंगने म्हटले आहे. 

अधिक वाचा : 'स्टेरॉयडस्'ची सवय सोडण्यासाठी हनी सिंग रिहॅब सेंटरमध्ये?

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे बॉलीवूड स्टार हृतिक रोशन आणि सोनम कपूरवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे तुर्कीत शूट करण्यात आले आहे. व्हिडिओ सोनम शानदार अंदाजात दिसत आहे. हे गाणे १ सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात आले. पण हे गाणे हॉटस्टारवर ३१ ऑगस्ट रोजीच रिलीज करण्यात आले. 

हे गाणे हृतिक रोशन आणि हनी सिंग यांनी ट्विटरवरून आपल्या फॅनसाठी शेअर केले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.