हृतिकला या अभिनेत्रीबरोबर करायचं नाही काम ?

आशिकी-3 या आगामी चित्रपटात हृतिकबरोबर कोण काम करणार यावर अजूनही संभ्रम कायम आहे. 

Updated: Jan 25, 2016, 06:53 PM IST
हृतिकला या अभिनेत्रीबरोबर करायचं नाही काम ? title=

मुंबई : आशिकी-3 या आगामी चित्रपटात हृतिकबरोबर कोण काम करणार यावर अजूनही संभ्रम कायम आहे. सोनम कपूर या चित्रपटात काम करणार होती, पण ऐनवेळी तिनं काम करायला नकार दिला. त्यानंतर सोनमच्या ऐवजी कंगना राणावत या चित्रपटात काम करेल अशी चर्चा होती. 
कंगनाला आशिकी-3मध्ये घेण्याबाबत हृतिकशी चर्चा केली असता, त्यानं कंगनाच्या नावाला विरोध दर्शवला, इतकच काय तर कंगना असेल तर मीच या चित्रपटात काम करणार नाही, अशी धमकीच हृतिकनं दिली, अशा चर्चा आहेत. 

हृतिक आणि कंगनाच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेले कित्येक वर्ष झाल्या. पण सुझेनबरोबर घटस्फोट झाल्यानंतर मात्र या दोघांमध्ये काही तरी वाजलं. या दोघांमधलं नातं एवढ ताणलं गेलं की पुरस्कार सोहळ्यांमध्येही हे दोघं एकमेकांना टाळू लागले. आणि त्यामुळेच या दोघांचं एकत्र काम करण्याचं गणित फिस्कटल्याचं बोललं जात आहे.