माझ्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री- शाहरुख खान

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं म्हणणं आहे की, त्याच्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री आहे. चांगला पेंटर असलेल्या सलमाननं तुम्हाला काही स्केच बनवून गिफ्ट दिलंय का? हा प्रश्न शाहरुखला विचारला असता तो म्हणाला, हे प्रश्न आता जुने झाले आहेत आणि या प्रश्नावर उत्तर देणं मला बोअर झालंय.

Updated: Aug 2, 2014, 04:35 PM IST
माझ्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री- शाहरुख खान title=

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं म्हणणं आहे की, त्याच्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री आहे. चांगला पेंटर असलेल्या सलमाननं तुम्हाला काही स्केच बनवून गिफ्ट दिलंय का? हा प्रश्न शाहरुखला विचारला असता तो म्हणाला, हे प्रश्न आता जुने झाले आहेत आणि या प्रश्नावर उत्तर देणं मला बोअर झालंय.

शाहरुखनं एका कार्यक्रमादरम्यान बोलतांना सांगितलं की, आता आम्ही भेटतो. एक-दुसऱ्याला मिठीही मारतो. आमच्यामध्ये प्रेम, मैत्री आणि सगळंच आहे. शाहरुख आणि सलमानच्या शत्रुत्व आणि नंतर दोघांच्या भेटीचे किस्से बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहेत.  

यादरम्यान माहिती मिळालीय की, शाहरुख पुन्हा छोट्या पडद्यावर परततोय. एका रिऍलिटी शोचं शाहरुख होस्टिंग करणार आहे. तो गॉट टॅलेंटचा एंकरच्या रुपात दिसेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.