आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काय शिजतंय?

आजकाल बॉलीवूडची हॉट आणि लाखों यंगस्टर्सच्या दिलों की धडकन बनलेली क्युट अभिनेत्री आलिया भट्ट बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेत्यासोबत डेट करीत आहे.

Updated: Dec 5, 2014, 07:43 PM IST
आलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काय शिजतंय? title=

मुंबई : आजकाल बॉलीवूडची हॉट आणि लाखों यंगस्टर्सच्या दिलों की धडकन बनलेली क्युट अभिनेत्री आलिया भट्ट बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेत्यासोबत डेट करीत आहे.

हो हे खरं आहे. आजकाल आलियात हृदयात कोणी तरी बसलं आहे. पण तो वरूण धवन नसून दुसरा कोणी तरी आहे. आलियाच्या अस्वस्थतेमागे बॉलीवूडचा कूल अँड हॅडसम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आहे. 

सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे की, खरचं आलिया आणि सिद्धार्थचं गॅटमॅट सुरू आहे का... हे दोघं एकमेंकांना डेटिंग करताय का?... ती यापूर्वी वरूण सोबत होती का? या प्रश्नांना उधाण आले आहे.  

पण सध्या हे दोघे एकमेंकांना वेळ देऊ शकत नाही. कारण आलिया सध्या शाहिद कपूर सोबतच्या 'शानदार' चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये आहेत त्यामुळे सिद्धार्थशी ती फोनवरून टचमध्ये आहे. तसेच ते दोघे तासंनतास चॅटिंगही करतात असे सूत्रांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.