रेस-3 मध्ये सैफऐवजी सलमान?

रेस आणि रेस-2 च्या यशानंतर आता रेस-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Aug 1, 2016, 08:59 PM IST
रेस-3 मध्ये सैफऐवजी सलमान? title=

मुंबई : रेस आणि रेस-2 च्या यशानंतर आता रेस-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान ऐवजी सलमान खान अभिनय करणार असल्याचं बोललं जात आहे. 

याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी सलमाननं या चित्रपटाची कथा ऐकली आहे. लवकरच सलमान या चित्रपटाला होकार देईल, असा अंदाज आहे. रेस चित्रपटांचे आत्तापर्यंतचे सिक्वल हे शहरी भागातले होते. त्यामुळे या चित्रपटातून बऱ्याच कालावधीनंतर सलमानचा शहरी लूक त्याच्या फॅन्सना पाहायला मिळू शकतो.