जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर'ची तुफान कमाई

हॉलीवूड सुपरस्टार जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातलाय. 

Updated: Nov 22, 2015, 05:52 PM IST
जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर'ची तुफान कमाई title=

नवी दिल्ली : हॉलीवूड सुपरस्टार जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातलाय. 

२६ दिवसांत या चित्रपटाने तब्बल ३६८३ कोटी रुपयांची कमाई केलीय. केवळ लंडनच नव्हे तर जगभरातील ब्लॉकबस्टर हा सिनेमा ठरलाय. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला प्रतिसाद मिळतोय. 

शुक्रवारी म्हणजे कालच हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला. जेम्स बॉन्डचा हा २४ वा सिनेमा आहे. त्यामुळे जगभरात धुमाकूळ घालत असलेला हा सिनेमा भारतात किती गाजणार हा येणारा काळच ठरवेल. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात वर्ल्ड रेकॉर्ड तोडला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.