रजनीकांतच्या सिनेमात हा असणार राधिकाचा रोल

रजनीकांत आणि राधिका आपटेचा काबली चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

Updated: Mar 3, 2016, 09:41 PM IST
रजनीकांतच्या सिनेमात हा असणार राधिकाचा रोल title=

मुंबई: रजनीकांत आणि राधिका आपटेचा काबली चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटातल्या या दोघांच्या भूमिका काय असतील याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक पा.रणजीत यांनी केला आहे.

या चित्रपटामध्ये रजनीकांत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये डायलॉग मारताना दिसणार नाही. या चित्रपटामध्ये रजनिकांत एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसेल, असं रणजीत यांनी सांगितलं आहे. 

तर राधिका आपटे या चित्रपटामध्ये रजनिकांतच्या बायकोच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटामध्ये राधिकाला घेतल्यामुळे अनेकांनी टीका केली, पण राधिकानं या सगळ्यांना उत्तम अभिनय करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे, असंही रणजीत म्हणाले आहेत.  

गोव्याच्या समुद्रावर रजनीकांत आणि राधिका आपटेचं एक रोमँटिक गाणंही शूट करण्यात आलं आहे. 

115 दिवस चाललेल्या या चित्रपटाचं शूटिंग मलेशिया, थायलंड, चेन्नई आणि गोव्यामध्ये झालं आहे. हा चित्रपट तामीळनाडूतल्या निवडणुकांनंतर म्हणजेच मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणार आहे.