या बॉलिवूड अभिनेत्याची मुलीपेक्षा बायको लहान

बॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये काय घडेल आणि काही नाही, हे काही सांगता येत नाही. चक्क एका अभिनेत्यांने आपल्या मुलीपेक्षा लहान वयाच्या मॉडेलशी लग्न केले. तेही ६९ व्या वर्षी. याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

Updated: Jan 21, 2015, 07:38 AM IST
या बॉलिवूड अभिनेत्याची मुलीपेक्षा बायको लहान title=
Pic - BCCL

मुंबई :बॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये काय घडेल आणि काही नाही, हे काही सांगता येत नाही. चक्क एका अभिनेत्यांने आपल्या मुलीपेक्षा लहान वयाच्या मॉडेलशी लग्न केले. तेही ६९ व्या वर्षी. याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

आजकाल मोठ्याप्रमाणात लग्न होतात आणि ब्रेकअपही. आता तर लिंकअप्स आणि ब्रेकअप्स होण्याच्या घडामोडी तशा कॉमन आहेत. आजकाल रिलेशनशिप्स काही मोठी गोष्ट राहिली नाही. एकेकाळी आपल्या बहारदार अभिनयाने आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने लाखो तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते कबीर बेदी यांनी नुकताच ६९ वा वाढदिवस साजरा केला. हा विषय चर्चेचा नाही. मात्र, त्यांनी केलेले लग्न हा चर्चेचा विषय झालाय.

कबीर बेदी चौथ्यांदा बोहल्यावर चढलेत. चौथी पत्नी ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल परवीन दुसांज ही ४० वर्षांची आहे. मुलगी पूजा बेदी ही ४४ वर्षांची आहे. पहिली पत्नी प्रोतिमा बेदी यांच्यापासून पूजाचा जन्म झाला होता. त्यामुळेच ‘बेटी माँ से बडी’ अशी स्थिती बेदी कुटुंबात आहे तर!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.