अंध छायाचित्रकाराच्या नजरेतून कतरिनाचे सौंदर्य

अभिनेत्री कतरिनाचं सौंदर्य एका अंध छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात साठवलं आहे. बॉलीवूडच्या बार्बी डॉलचं सौंदर्यं टिपतांना अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडते, कतरिनानं नुकतंच एका साबणाच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केलं.

Updated: Jan 21, 2015, 07:08 PM IST
अंध छायाचित्रकाराच्या नजरेतून कतरिनाचे सौंदर्य title=

मुंबई : अभिनेत्री कतरिनाचं सौंदर्य एका अंध छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात साठवलं आहे. बॉलीवूडच्या बार्बी डॉलचं सौंदर्यं टिपतांना अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडते, कतरिनानं नुकतंच एका साबणाच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केलं.

मात्र हे फोटोशूट अनोखं होतं, याची एक खासियत होती. कारण कतरिनाचे फोटो टीपणारा फोटो ग्राफर हा अंध होता, मात्र भावेशने  कतरिनाचे असे काही फोटो टिपले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

बार्बी डॉल कतरिना देखिल हे  फोटो पाहून भारावून गेली, भावेशने हे फोटो कसे टिपले याचा एक व्हिडीओ देखिल आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.