'दोघांसोबत मी फिरतेय, एकासोबत डेटींग सुरू आहे'

 अभिनेत्री कल्की कोयचलिनने अनुराग कश्यप यांच्याशी नव्याने संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे, कारण अभिनेत्री कल्की कोयचलिन आणि तिचा पूर्वीचा पती अनुराग कश्यप यांच्यात पुन्हा नवे संबंध तयार होत असल्याची चर्चा होती.

Updated: May 31, 2016, 07:15 PM IST
'दोघांसोबत मी फिरतेय, एकासोबत डेटींग सुरू आहे' title=

मुंबई :  अभिनेत्री कल्की कोयचलिनने अनुराग कश्यप यांच्याशी नव्याने संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे, कारण अभिनेत्री कल्की कोयचलिन आणि तिचा पूर्वीचा पती अनुराग कश्यप यांच्यात पुन्हा नवे संबंध तयार होत असल्याची चर्चा होती.

सध्या सुरू असलेल्या अफवा लक्षात घेतल्यातर दोघांसोबत मी फिरत आहे आणि एकासोबत डेटींग करीत आहे.  अनुराग संबंधी सुरू असलेल्या चर्चेला कल्कीने उत्तर सोशल मीडियावरुन दिले आहे. या सर्व अफवा आहेत असे ट्विट कल्किने केले आहे.

कल्कीचे नाव काही दिवसापूर्वी फरहान अख्तर आणि नीरजा चित्रपटातील जिम सरभ याच्यासोबत जोडण्यात येत होते. या दोघांसोबत तिचे संबंध असल्याच्या अफवा जोरात आहेत. तर पूर्व पतीसोबत ती पुन्हा डेटींग करीत असल्याच्या अफवांनाही उधाण आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कल्कीने अशा बातम्यांपासून सावध राहण्याचे चाहत्यांना कळवले आहे. काही दिवसापूर्वी कल्कीचा 'मार्गरीटा विद ए स्ट्रा' चित्रपट यशस्वी ठरला होता.