कपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन

सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले. 

Updated: Jun 16, 2016, 12:48 PM IST
कपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन title=

मुंबई : सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले. 

इतकी प्रचंड कमाई करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरलाय. यापूर्वी एकाही मराठी चित्रपटाला इतकी कमाई करता आली नव्हती. नुकताच सैराटची टीम कपिल शर्माच्या शोमध्ये दिसली होती. 

 

या शोमध्ये सैराटच्या कलाकारांनी साऱ्यांना झिंगाट केले. सैराटला मिळत असलेल्या या जबरदस्त प्रतिसादाचा फायदा कपिल शर्माच्या शोमध्येही दिसून येतोय. 

यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये सध्या कपिल शर्माचा सैराट स्पेशल शो नंबर वन आहे. सगळ्या शोजना पाठी टाकून हा एपिसोड ट्विटरवर जबरदस्त पाहिला जातोय.