वडिलांच्या बर्थ डे पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दाखल झाली करिष्मा कपूर

Last Updated: Friday, February 17, 2017 - 17:36
वडिलांच्या बर्थ डे पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दाखल झाली करिष्मा कपूर

मुंबई : 15 फेब्रुवारी रोजी अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस कपूर खानदानानं मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते. 

या गर्दीत एक चेहरा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता... तो म्हणजे करिश्माचा बॉयफ्रेंड संदीप तोष्नीवाल... गेल्या काही दिवसांपासून करिष्मा आणि संदीपच्या अफेअरची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. 

आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला करिष्मा संदीपला सोबत घेऊनच पार्टीत दाखल झाली होती. यावरून हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत रणधीर आणि बबितासोबत करिश्मा आणि संदीप दिसत आहेत.


करिष्मा आणि संदीप

उल्लेखनीय म्हणजे, करिष्मा हिनं पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतलाय. तिला संजयसोबत दोन मुलं आहेत. तर संदीप त्याच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याच्या प्रयत्नात आहे. पत्नी सायकोलॉजिकल डिसऑर्डरनं पीडित असल्याचं त्यानं आपल्या घटस्फोटाच्या अर्जात म्हटलंय. एका फार्मास्यूटीकल्स कंपनीत सीईओ असलेल्या 11 वर्षांची आणि 6 वर्षांची दोन मुली आहेत.

#birthday#selfie#love#family#goodtimes#memories#weloveyoupapa

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला सैफ अली खान, करिना कपूर, मलाइका अरोडा, अमृता अरोडा, ऋषी कपूर, नीतू कपूर, रेखा, अमिताभ बच्चन हेदेखील सहभागी झाले होते. 

First Published: Friday, February 17, 2017 - 17:36
comments powered by Disqus