‘किक’मध्ये : 57 कार, 13 बस, हेलिकॉप्टर झाले नष्ट

 ‘किक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा डेब्यू करणारे फिल्म निर्माता साजिद नाडियावाला सलमानला घेऊन केलेल्या या चित्रपटाबाबत खूपच आश्वस्त आहेत. या चित्रपटासाठी साजिदने खूप जास्त पैसा ओतला आहे. कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनविण्याचा साजिदचा प्रयत्न आहे. 

Updated: Jul 23, 2014, 06:17 PM IST
‘किक’मध्ये : 57 कार, 13 बस, हेलिकॉप्टर झाले नष्ट title=

मुंबई :  ‘किक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा डेब्यू करणारे फिल्म निर्माता साजिद नाडियावाला सलमानला घेऊन केलेल्या या चित्रपटाबाबत खूपच आश्वस्त आहेत. या चित्रपटासाठी साजिदने खूप जास्त पैसा ओतला आहे. कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनविण्याचा साजिदचा प्रयत्न आहे. 

जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल बोलले जाते की आतापर्यंतची सर्वात जबरदस्त अॅक्शन चित्रपट आहे. चित्रपटाच्या शुटिंगवेळी अॅक्शन सिक्वेन्समध्ये सुमारे ५७ कार, १३ बस आणि एक हेलिकॉप्टर नष्ट झाले. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे की शुटिंगवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनं नष्ट झाली आहेत.


 

 चित्रपटातील काही स्टंट स्वतः सलमानने केले असल्याचे साजिदने सांगितले. चित्रपटाचे शुटिंग लंडन, पोलंड आणि दिल्लीतील गल्ल्यांमध्ये झाले आहे. 

याबाबत सलमान खान म्हणाला की, मी स्वतःला भाग्य़वान समजतो की मला अशा निर्मात्याबद्दल काम करायला मिळाले. जो आपल्या चित्रपटासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो. केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक हिरो म्हणून आम्ही इतक्या उंचावरून किक मारू शकतो किंवा जंप मारू शकतो. तंत्रज्ञानामुळे आम्हांला सुरक्षा प्रदान केली जाते. 


 

दरम्यान किकच्या जबरदस्त ट्रेलरने अनेकांची मन जिंकली आहेत. चित्रपटाच्या रिलीज पूर्वी त्याचे जुम्मे की रात हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आहेत. किक येत्या २५ जुलै रोजी रिलीज होणार आहे.


 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.