बिग बॉस 8 मध्ये दिसणार मराठी बिकिनी गर्ल सोनाली राऊत

बिग बॉस 8 च्या स्पर्धकांच्या यादीत किंगफिशरची कँलेंडर गर्ल सोनाली राऊतचे नाव जोड़ले गेले आहे. सोनाली नुकतील ‘द एक्सपोझ’ मध्ये दिसली होती.

Updated: Sep 9, 2014, 06:01 PM IST
बिग बॉस 8 मध्ये दिसणार मराठी बिकिनी गर्ल सोनाली राऊत title=

मुंबई : बिग बॉस 8 च्या स्पर्धकांच्या यादीत किंगफिशरची कँलेंडर गर्ल सोनाली राऊतचे नाव जोड़ले गेले आहे. सोनाली नुकतील ‘द एक्सपोझ’ मध्ये दिसली होती.

किंगफिशर कँलेंडरमध्ये सोनालीचा बिकिनी अवतार पाहून सर्वांना धक्का बसला होता. पण ‘द एक्सपोझ’ चित्रपटात आपले इप्रेशन टाकू शकली नाही. आता सोनालीला सर्वाधिक चर्चित शो बिग बॉसमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तिला पर्फेक्ट लॉन्च मिळू शकते.

बिग बॉस ८ हे २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  बिग बॉस ८ चे आतापर्यंत जितके प्रोमो दिसले त्यात सलमान पायलटच्या ड्रेसमध्ये प्लेन उडविताना दिसला आहे. त्याचा एका प्रोमोची शुटिंग मुंबई एअरपोर्टवर झाली. मुंबई एअरपोर्टवरील हा प्रोमो रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे.

या सिझनमध्ये एक ससा देखील पाहुणा म्हणून घऱात जाणार आहे. गेल्या सिझनमध्ये एक कुत्रा बिग बॉसचा पाहुणा होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.