बिग बॉस ९ : सेक्स रॅकेटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा समावेश?

भरपूर मसाला असलेली मालिका बिग बॉस ९ पुन्हा येत आहे, यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि अनोख्या चेहऱ्यांना सहभागाचं निमंत्रण दिलं जात आहे, याची यादी लिक झाली असल्याचं सांगण्यात येत आहे

Updated: Aug 31, 2015, 10:55 PM IST
बिग बॉस ९ : सेक्स रॅकेटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा समावेश? title=

नवी दिल्ली : भरपूर मसाला असलेली मालिका बिग बॉस ९ पुन्हा येत आहे, यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि अनोख्या चेहऱ्यांना सहभागाचं निमंत्रण दिलं जात आहे, याची यादी लिक झाली असल्याचं सांगण्यात येत आहे

श्वेता बसू प्रसाद
'मकडी' सिनेमात तुम्ही पाहिलेली बालकलाकार श्वेता बसू प्रसाद, त्यानंतर 'कहानी घर घर की' मधून घराघरात पोहोचली, यानंतर तिने सर्वांच्या आठवणीत राहणारा सिनेमा इक्बालमध्ये महत्वाची भूमिका केली. यानंतर एका सेक्स रॅकेटमध्ये देखील श्वेता बसू प्रसादचं नाव चर्चेत आलं.

राहुल यादव
हाऊसिंग डॉट कॉमचा माजी सीईओ राहुल यादव, ज्याला नोकरी सोडल्यानंतर घरही सोडावं लागलं होतं, ज्याने वेबविश्वाच्या जगात काल्पनिक वादळ निर्माण केलं होतं.

व्हीजे बानी
रोडीज सिझन ४ जिंकणारी व्हीजे बानी, बिग बॉसच्या घरात येणार असल्याने मोठी टक्कर स्पर्धकांना असणार आहे.

आशा नेगी
टीव्ही जगतातला एक चेहरा, जो पवित्र रिश्ता मालिकेतून सर्वांपर्यंत पोहोचला, आशा नेगी 'इंडियन आयडॉल ज्यूनियर'वर झळकतेय.

रश्मी देसाई
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई ही नच बलिए या रियालिटी डान्स शोमधून नावारूपाला आली आहे

राधे माँ
राधे माँ सध्या जोरदार चर्चेत आहे, स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ सध्या चर्चेत आहे. मिनी स्कर्ट आणि लोकप्रिय सत्संगमुळे राधे माँ चर्चेत आली आहे.

बिगबॉस ९ च्या सिझनमध्ये वरील सेलिब्रिटींचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.