पाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं

Updated: May 7, 2016, 11:37 AM IST
पाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं title=

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायिका आर्ची आणि नायक परश्या एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.

तळेगावात शुक्रवारी सायंकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बरेच मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून सैराटचे मुख्य कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु आले होते. त्यांचे आगमन झाल्यापासून सर्व तरुणाई त्यांच्यांशी बोलण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली.  

उत्साही तरुणांना काबूत आणण्यासाठी संयोजकांनी बराच प्रयत्न केला, मात्र त्यांना काही यश आले नाही. त्यामुळे मध्यभागात झालेल्या गर्दीमुळे मागे बसलेल्या नागरिकांना नीट कार्यक्रम पाहता आला नाही.

या सर्व गोंधळाच्या निमित्ताने सगळ्यांना परश्या आणि आर्चीची किती क्रेझ आहे हे तरी दिसून आले, मात्र तरुणांच्या अतिउत्साहामुळे इतर रसिकांचा रसभंग झाला.