कुठे गायब झाली 'मैं हूँ खुशरंग हिना' म्हणणारी ही हिरोईन?

१९९१ साली सुपरहिट ठरलेल्या 'हिना' सिनेमातला हा चेहरा तर तुम्हाला अजूनही आठवत असेल... पण, या चेहऱ्याचं नाव आठवयला जड जातंय का?

Updated: Jun 29, 2016, 11:02 PM IST
कुठे गायब झाली 'मैं हूँ खुशरंग हिना' म्हणणारी ही हिरोईन? title=

मुंबई : १९९१ साली सुपरहिट ठरलेल्या 'हिना' सिनेमातला हा चेहरा तर तुम्हाला अजूनही आठवत असेल... पण, या चेहऱ्याचं नाव आठवयला जड जातंय का?

या चेहऱ्याचं नाव आहे जेबा बख्तियार... मूळची पाकिस्तानची असलेल्या जेबानं पहिल्याच दमात प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. पण, त्यानंतर ती कुठे गायब झाली हा प्रश्न प्रेक्षकांना आजही सतावत असतो.  

मूळची पाकिस्तानची... 

जेबाचं खरं नाव आहे शाहीन... ५ नोव्हेंबर १९६५ रोजी तिचा पाकिस्तानात जन्म झाला होता. लाहोर आणि कतारमधून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पाकिस्तानात छोट्या पडद्यावर तिनं काम सुरू केलं. 'अनारकली'मध्येही तीनं महत्त्वाची भूमिका निभावली. 


'हिना'

बॉलिवूडमध्ये एन्ट्री 

यानंतर तिला आरके बॅनरखाली बॉलिवूडचं तिकीट मिळालं... आणि 'हिना'च्या भूमिकेत ती भारतीय प्रेक्षकांसमोर दाखल झाली. या सिनेमात ऋषी कपूर आणि अश्विनी भावे यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 

त्यानंतर मात्र चांगल्या संधी न मिळाल्यानं जेबा पाकिस्तानात परतली. तिथं तिनं अनेक सिनेमांत काम केलं. तसंच ती अनेक टीव्ही शोमध्येही दिसते. 


जेबा बख्तियार

खाजगी आयुष्यात... 

जेबानं चार विवाह केल्याचं म्हटलं जातं. पहिल्या विवाहापासून तिला एक मुलगी आहे. तर तिचा दुसरा पती होता प्रसिद्ध गायक अदनान सामी... अदनान-जेबाचा एक मुलगाही आहे. १९९७ साली तिनं अदनानशी तलाक घेतला... त्यानंतर तिनं सोहेल खान लेगहारी याच्याशी विवाह केला.