ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे मुंबईत आज पहाटे निधन झाले. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.

Updated: Aug 6, 2014, 11:01 AM IST
ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे मुंबईत आज पहाटे निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.

स्मिता तळवलकर यांचे मराठी चित्रपट सृष्टीत मोठे योगदान आहे. त्यांनी मराठी सिनेमा, नाट्य आणि दूरचित्रवाणी मालिका या क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. स्मिता तळवलकर यांनी 'अस्मिता चित्र अकादमी'ची स्थापना केली आहे. गेली 40 वर्ष त्यांनी मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमात काम केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी स्मिता तळवलकर होत्या. 

कौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय. अशोक पाटोळे लिखित या नाटकातून स्मिता तळवलकर यांनी ब-याच वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं. या नाटकातल्या वयोवृध्द महिलेची अर्थात दुर्गाबाईंची प्रमुख भूमिका साकारत स्मिता तळवलकर यांनी रंगभूमीवर ब-याच वर्षांनी पुनरागमन केलं होतं. नाटकाच्या माध्यमातून स्मिता तळवलकर आणि सतीश पुळेकर यांची अनोखी जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळाली होती.

आपलं पहिलं प्रेम असलेल्या मनोरंजन क्षेत्रावर असल्याचे अनेकवेळा स्मिता तळवलकर यांनी सांगितलं आहे. त्यांनी अनेकवेळा 'चौकट राजा'बाबत भरभरून बोलल्या आहेत. माझ्या काही भूमिका मन समृद्ध करत गेल्या. त्यातली एक 'चौकट राजा', असे त्या सांगत असतं. 'चौकट राजा'नं मला अनुभवानं मोठं केलं. पहिल्यांदा स्क्रीप्ट वाचलं तेव्हा लक्षातही आलं नव्हतं त्यातलं गांभीर्य. पण जेव्हा त्यात शिरत गेले तेव्हा विषयाची खोली लक्षात आली. खरं सांगायचं तर घाबरायला झालं.  इतकं झेपेल ना आपल्याला? कामाला सुरुवात झाली आणि त्यापुढचं वर्ष मंतरल्यासारखं पार झालं. 'चौकट राजा'मधली मीनल करता करता स्मिता तळवलकरला समृद्ध करणं फक्त याच क्षेत्राला जमलं, अस त्या नेहमी सांगत असत. 

त्यांचे काही मराठी सिनेमे

तू सौभाग्यवती (१९८६)
गडबड घोटाळा (१९८६)
कळत नकळत (१९८९) 
चौकट राजा भूमिका: मिनल (१९९१)
सवत माझी लाडकी (१९९३)
शिवरायाची सून ताराराणी (भूमिका: येसुबाई, १९९३) 
तू तिथं मी (१९९८)
सातच्या आत घरात (२००४)
आनंदाचं झाड (२००६)
चेकमेट (२००८)
टोपी घाला रे (२०१०)
अडगुळ मडगुळ (२०११)
एक होती वाडी (२०११)
जन्म (२०११, भूमिका: स्त्रीरोगतज्ज्ञ)
श्यामचे वडील (२०१२)
या गोल गोल डब्यातलं (२०१२)
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१३)

टी व्ही मालिका
घरकुल
पेशवाई
अवंतिका
ऊन पाऊस
कथा एक आनंदीची
अर्धांगिनी
सुवासिनी
उंच माझा झोका

नाटक
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, भूमिका - जनाबाई

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.