'कॉमेडी नाईट्स'मधून कपीलनंतर सिद्धूपण आऊट

कॉमेडी नाईट्समधून कपील शर्मा पाठोपाठ आता नवजोत सिंग सिद्धुनंही एक्झिट घेतली आहे.

Updated: Jan 31, 2016, 10:28 PM IST
'कॉमेडी नाईट्स'मधून कपीलनंतर सिद्धूपण आऊट title=

मुंबई: कॉमेडी नाईट्समधून कपील शर्मा पाठोपाठ आता नवजोत सिंग सिद्धुनंही एक्झिट घेतली आहे. सिद्धूच्याऐवजी आता कॉमेडी नाईट्समध्ये गायक मिका सिंग दिसेल. कॉमेडी नाईट्स विथ कपील ऐवजी कॉमेडी नाईट्स लाईव्ह असं या शोचं नामकरण करण्यात आलं आहे. 
कपील शिवाय असणाऱ्या या नव्या शोमध्ये सिद्धू सहभागी होणार होता, त्याबाबत त्यानं कलर्स चॅनला आपला होकारही कळवला होता, पण शेवटच्या क्षणी काय फिस्कटलं याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कॉमेडी नाईट्स लाईव्हमध्ये भारती सिंग, कृष्णा अभिषेक, रश्मी देसाई यांच्याबरोबर आता मिका सिंगचीही एन्ट्री झालेली आहे. पण कपीलच्या शो इतकी प्रसिद्धी या शोलाही मिळणार का हे थोड्याच दिवसांमध्ये स्पष्ट होईल.