बिग बॉसच्या घरात वाइल्ड ‘मिंक’ वादळ

बिग बॉसने बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल ‘मिंक बरार’ला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं ठरवलंय. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधीच मिंकनं एक खळबळजनक वक्तव्य केलय. मिंक म्हणाली की, यंदाचा बिग बॉसचा सिझन खूपच थंड आहे. मी घरात एन्ट्री करताच अख्खं घर हादरवून टाकणार आहे.

Updated: Nov 3, 2012, 04:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
बिग बॉसचं घर म्हणजे रोज नवीनवीन होणाऱ्या वादांचा भंडार. मॉडेल करिश्मा कोटकच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे करिश्माला बिग बॉसच्या घरातून जावं लागलं. घरातील एक सदस्य कमी झाल्याने बिग बॉसने बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल ‘मिंक बरार’ला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं ठरवलंय. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधीच मिंकनं एक खळबळजनक वक्तव्य केलय. मिंक म्हणाली की, यंदाचा बिग बॉसचा सिझन खूपच थंड आहे. मी घरात एन्ट्री करताच अख्खं घर हादरवून टाकणार आहे.
काही दिवसांपूर्वी किम विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्यामुळे बातम्यांमध्ये होती. स्वर्गीय देवानंद यांनी मिंकला त्यांच्या ‘प्यार का तराना’या चित्रपटात पहिला ब्रेक दिला होता.
बिग बॉसला मिंकला घरात दाखल करण्यासाठी आणखी एक कारण आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भगनानीने सलमान खानला ‘सीरिअल वूमनबीटर’ असं म्हटलं होतं. त्याबाबत सलमान आणि सपनामध्ये वादही झाला असेल. मोठ्यामोठ्यांची मस्करी करणाऱ्या सलमानवर असा आरोप होताच सलमानचीही शब्दसंपदा संपुष्टात आली होती. सपनाचा बदला घेण्यासाठी कदाचित सलमाननेच मिंकला वाइल्ड कार्ड एन्ट्री दिल्याचं म्हटलं जातं आहे. मिंकनं एका वृत्तपत्राला सांगितले की, “सपना भगनानी उद्धट आहे. मी तिला बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये बुडवणार आहे.”

आत्तापर्यत तरी बिग बॉस-६ मध्ये गेल्या काही सिझनपैकी काहीच वाद रंगला नव्हता, पण आता बिग बॉसच्या घराची ही पोकळी मिंक कदाचित भरून काढणार आहे. आणि प्रेक्षकांनाही हवा असलेला मसाला आता पाहायला मिळणार आहे.