व्हिडिओ: 'मिस टनकपूर हाजिर हो'च्या ट्रेलरची सोशल मीडियावर धूम

'मिस टनकपूर हाजिर हो' एक मनोरंजक चित्रपट आहे. हा चित्रपट १९ जूनला रिलीज होणार आहे. पाच दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला गेला, जो प्रेक्षकांनी खूप पसंत केलाय.

Updated: May 28, 2015, 09:10 AM IST
व्हिडिओ: 'मिस टनकपूर हाजिर हो'च्या ट्रेलरची सोशल मीडियावर धूम title=

मुंबई: 'मिस टनकपूर हाजिर हो' एक मनोरंजक चित्रपट आहे. हा चित्रपट १९ जूनला रिलीज होणार आहे. पाच दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला गेला, जो प्रेक्षकांनी खूप पसंत केलाय.

ट्रेलर पाहण्यात कमी बजेट चित्रपटांचा रेकॉर्ड मोडत या चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या ५ दिवसांमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलाय. 

ट्रेलर इतका मनोरंजक आहे की, बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही याबद्दल ट्विट केलं आणि सोबत ट्रेलरची लिंकही दिली.

चित्रपट एक राजकीय व्यंगात्मक आहे. यात एक म्हैस कोर्टात हजर होते आणि तिच्यामागे एक नवरा मुलगा दिसतो. याच्या पोस्टरवर लिहिलंय 'इट्स हॅपन्स ओन्ली इन इंडिया'...

ज्येष्ठ पत्रकार विनोग कापडी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. यात अन्नू कपूर, रिषिता भट्ट आणि 'मस्तराम' चित्रपटाद्वारे चर्चेत आलेला राहुल बग्गा मुख्य भूमिकेत आहेत. 

 
पाहा हा धमाकेदार व्हिडिओ -

  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.