'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चे पोस्टर रिलीज

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट प्रवासावर आधारित असलेल्या 'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले आहे. 

Updated: Mar 9, 2016, 05:20 PM IST
'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चे पोस्टर रिलीज  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट प्रवासावर आधारित असलेल्या 'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने ट्वीट करुन हे पोस्टर जारी केले आहे. 

या पोस्टरमध्ये केस वाढवलेला धोनी एका रेल्वे स्टेशनवर पू्र्णपणे सफेद कपड्यांत आणि एका टायमध्ये दिसतो. तो कसलातरी खोल विचार करत आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा शाळेत जाणारा धोनी असेल, असे वाटते. 'तुम्हाला माहित असणारी व्यक्ती, पण तिचा माहित नसणारा प्रवास' अशी या पोस्टरची आणि एकंदरच चित्रपटाची थीम आहे. 

महेंद्रसिंग धोनी भारतीय रेल्वेमध्ये टीसी म्हणूनही काम करत होता. त्यामुळे त्यावेळच्या काही घटनांचाही या चित्रपटात समावेश असण्याची शक्यता आहे. 
नीरज पांडे यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.