'नीतू कपूरला भेटण्यासाठी माझी आई भारतात आलेली नाही'

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या पॅचअपची शक्यता आता जवळपास मावळत चाललीय. 

Updated: Mar 30, 2016, 09:04 PM IST
'नीतू कपूरला भेटण्यासाठी माझी आई भारतात आलेली नाही' title=

नवी दिल्ली : कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या पॅचअपची शक्यता आता जवळपास मावळत चाललीय. 

गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामासाठी नसले तरी कतरीना आणि रणबीर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथीमुळे भलतेच चर्चेत आहेत. 

याच दरम्यान, कतरिा कैफ हिची आई सुझान भारतात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या नजरा कतरिनाच्या आईवर खिळल्या. सुझान या भारतात रणबीरची आई नीतू कपूर यांना भेटण्यासाठी आल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. 

पण, 'नीतू कपूरला भेटण्यासाठी माझी आई भारतात आलेली नाही' असं स्पष्ट करत कतरिनानं हे सगळे दावे फेटाळले आहेत. सुझान यांच्यावर पाँडिचेरी इथं शस्रक्रिया होणार आहे, त्यासाठीच त्या भारतात दाखल झाल्या आहेत, असं कतरिनानं म्हटलंय.