नागराजचा आर्चीला सल्ला

सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावातील अनुभवाबाबत बोलताना म्हणतो, मी एकदा मौन धरले होते, मी फार कमी बोलत होतो, तेव्हा लोकच म्हणायला लागले. लोकांना मी संत वाटायला लागलो, लोक मला म्हणायला लागले, लेका तू तर लईच भारी तू नॉनव्हेजही खात नसेल, पण मी सांगायचो मी खातो.

Updated: May 13, 2016, 12:06 AM IST
नागराजचा आर्चीला सल्ला title=

मुंबई : सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावातील अनुभवाबाबत बोलताना म्हणतो, मी एकदा मौन धरले होते, मी फार कमी बोलत होतो, तेव्हा लोकच म्हणायला लागले. लोकांना मी संत वाटायला लागलो, लोक मला म्हणायला लागले, लेका तू तर लईच भारी तू नॉनव्हेजही खात नसेल, पण मी सांगायचो मी खातो.

नागराज म्हणतो, लोक कधीही कुणालाही देव्हाऱ्यात बसवू शकतात, तेव्हा तुमचं स्टारपण नेहमी बाजूला ठेवा, मी रिंकूला नेहमी म्हणतो, घरी जाशील तेव्हा आईशी आर्ची म्हणून वागू नको, साधं रहा, पडेल ते आई सांगेल ते काम करं असं मी रिंकूला सांगत असतो, असं नागराज मंजुळेने म्हटलं आहे. माझ्या घरी या स्टार मंडळी कशी काम करते ते पाहा...