मी किंवा माझ्या पत्नीचा देश सोडून जाण्याचा विचार नाही - आमिर खान

आमिर खान याने गेल्या दोन पासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पहिल्यांदा एक प्रसिद्ध पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. 

Updated: Nov 25, 2015, 05:40 PM IST
मी किंवा माझ्या पत्नीचा देश सोडून जाण्याचा विचार नाही - आमिर खान  title=

मुंबई : आमिर खान याने गेल्या दोन पासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पहिल्यांदा एक प्रसिद्ध पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. 

आमिर खानचे प्रसिद्ध पत्रक काढून आपले म्हणणे मांडले आहे. 

पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो की मी किंवा माझी पत्नी किरण हिचा हा देश सोडून जाण्याचा विचार नाही आहे. आम्ही असे यापूर्वी केले नाही किंवा भविष्यात करणार नाही. माझा विरोध करणाऱ्यांनी माझी मुलाखत एकतर पाहिली नाही किंवा जाणून बुजून माझ्या मुलाखतीला मोडतोड़ करून मांडत आहे. 

भारत हा माझा देश आहे, माझं देशावर प्रेम आहे. मी या देशात जन्माला आलो आणि राहत आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान मानतो. 

दुसरे म्हणजे मी जे काही मुलाखतीत म्हटलो त्याचे मी आजही समर्थन करतो आहे. 

जे लोक मला देशद्रोही म्हणून संबोधित आहे. त्यांना मी एकच सांगू इच्छितो की मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. आणि अभिमान बाळगायला कोणाची परवानगीची गरज नाही आहे. 

जे लोक माझ्याविरोधात बोलत आहेत. संताप व्यक्त करत आहेत. दुर्दैवाने ते माझा मुद्दाच सिद्ध करत आहे. 

तसेच जे या काळात माझ्या सोबत आहेत त्या सर्वांचे धन्यवाद. आपण या सर्वात सुंदर आणि वैविध्यतेने नटलेल्या देशाचे संरक्षण केले पाहीजे. आपण या देशाचे एकात्मता, वैविधता, समग्रता, विविध भाषा, संस्कृती, इतिहास, सहिष्णूता, एकांतवादची कन्सेट, प्रेम, संवेदनशीलता आणि भावनिक क्षमता यांचे संरक्षण केले पाहिजे. 

मी माझ्या पत्रकाचा शेवट रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितेने करणार आहे. 

Where the mind is without fear and the head is held high, Where knowledge is free, Where the world has not been broken up into fragments, by narrow domestic walls, Where words come out from the depth of truth, Where tireless striving stretches its arms towards perfection, Where the clear stream of reason has not lost its way, Into the dreary desert sand of dead habit, Where the mind is led forward by thee, Into ever-widening thought and action, Into that heaven of freedom, my father, let my country awake.

जय हिंद 

आमिर खान 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.