नवोदित लघुचित्रपट निर्मात्यांना सुवर्णसंधी, नवे व्यासपीठ

चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यासाठी उदयोन्मुख आणि प्रयोगशील लघुचित्रपट निर्मात्यांना आपल्या हक्काच व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘सिद्धकला आर्ट व्हिजन’ सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे.  या संस्थेतर्फे ‘कॅम व्हिड लघुचित्रपट महोत्सवा’चे आयोजन मार्च महिण्यात करण्यात आले आहे.

Updated: Jan 18, 2015, 11:05 PM IST
नवोदित लघुचित्रपट निर्मात्यांना सुवर्णसंधी, नवे व्यासपीठ title=

मुंबई : चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यासाठी उदयोन्मुख आणि प्रयोगशील लघुचित्रपट निर्मात्यांना आपल्या हक्काच व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘सिद्धकला आर्ट व्हिजन’ सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे.या संस्थेतर्फे ‘कॅम व्हिड लघुचित्रपट महोत्सवा’चे आयोजन मार्च महिण्यात करण्यात आले आहे.

या महोत्सवासाठी लघुचित्रपट निर्मात्यांना विनामूल्य सह्भागी होता येणार आहे. संस्थेचे हे पहिलेच वर्ष असून या महोत्सवासाठी सामाजिक जनजागृतीवर (Social Awairness ) आधारित लघुपट दाखवण्याची सुंवर्णसंधी स्पर्धकांना मिळणार आहे. इतर कोणत्याही विषयावरील मोबाईल शूट (Mobile Shoot), अनिमेशन (Animation) अशा विविध विभागात ही स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या उत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र संस्थेकडून देण्यात येईल. स्पर्धकांना मराठी,  हिंदी , इंग्रंजी या भाषांमध्ये लघुपट पाठवता येतील.

विनामुल्य प्रवेशिकाची अंतिम तारीख २५ फेब्रुवारीपर्यंत असेल व निवडक लघुपटांचे सादरीकरण करण्यात येईल. उत्कृष्ट लघुपट सादरीकरणाची आणि पारितोषिक वितरणाची अंतिम तारीख नंतर कळवण्यात येईल. तसेच तज्ज्ञ आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन, चर्चा आणि प्रश्नोत्तरे अशी कार्यक्रमाची रुपरेषा असेल. अधिक माहितीसाठी http://siddhakalaartvision.wix.com/siddhakalaartvision  या संकेतस्थळावर तसेच ७०४५१२६३६९, ९८६९३६५९२९ आणि ९८९२२६२०७६ या भ्रमणध्वनीवर संपर्क करता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.