'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Nov 12, 2016, 07:21 PM IST
'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल' title=

मुंबई : पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे. नोटा बंद झाल्यामुळे सध्या नागरिकांना त्रास होत आहे तो थोड्या काळासाठी आहे. हे देशाच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. या निर्णयामुळे माझ्या चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल, असं आमिर खान म्हणाला आहे.

पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द झाल्यामुळे सध्या चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स ओस पडली आहेत. 23 डिसेंबरला आमिर खानचा दंगल हा चित्रपट रिलीज होत आहे.

पाहा काय म्हणाला आमिर खान