डर्टी गर्ल विद्या होतेय जासूस

बॉलीवूड डर्टी गर्ल विद्या बालन तिचा आगामी चित्रपट `बॉबी जासूस`साठी खूप मेहनत घेत आहे. `बॉबी जासूस`मध्ये विद्या गुप्तहेरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Updated: May 19, 2014, 09:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूड डर्टी गर्ल विद्या बालन तिचा आगामी चित्रपट `बॉबी जासूस`साठी खूप मेहनत घेत आहे. `बॉबी जासूस`मध्ये विद्या गुप्तहेरच्या भूमिकेत दिसणार आहे.
गुप्तहेर भुमिकेसाठी विद्या वास्तविक जीवनातील काही महिला गुप्तहेरांकडून आवश्यक माहिती मिळवत आहे. विद्या भूमिकेच्या प्रशीक्षण आणि तयारीसाठी पूर्ण वेळ देणार आहे. त्यासाठी तिने स्व:ताची कंबर कसलीय.
मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, विद्या ज्या गुप्तहेर महिलांना भेटली त्यात ८५ टक्के गृहिणी महिला आहेत. ज्या पार्ट टाईम व्यवसाय म्हणून गुप्तहेरचं काम करतात. दिया मिर्जा आणि तिचा बिझनेस पार्टनर साहिल सांघा हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.